BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नाशिकमध्ये भरणार नव-उद्योजकांचा मेळावा
Posted on: 22-06-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई 

कोणत्याही यशस्वी उद्योगाच्या तळाशी एक कल्पना असते. कल्पकतेच्या जोरावरच अनेक व्यवसाय बहरले, विस्तारले.

बहुतांश वेळा उत्तम कल्पना असते पण कल्पकतेचा अर्थकारणाची जोड न मिळाल्याने ती कल्पना अस्तित्वात येण्यापूर्वीच अस्तंगत होते. अशा उत्तम आणि जगावेगळ्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘दी बिझअप’ ही संस्था कार्यरत आहे. विविध कल्पनांना घेऊन नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या कंपन्यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते बिझअप ऍवॉर्ड्सने गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे, इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का, संगीत दिग्दर्शक संतोष सिंग, अभिनेता गुरलीन चोप्रा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार, २५ जून २०१७ रोजी नाशिकच्या ग्रॅण्ड रिओ या पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यात भारतातील उत्तम अशा ५० स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांसमोर स्वत:च्या उद्योगाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. या ५० स्टार्टअप्समधून सर्वोत्तम १० स्टार्टअप्सना गौरविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सना उत्तेजन मिळावी म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळ्यास नव-उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे असे आवाहन दी बिझअप संस्थेचे संचालक हितेश, विनायक आणि नयन यांनी केले आहे.

नोंदणीसाठी संपर्क : हितेश ९१५६८३१४०४

http://www.thebizzup.com/register या संकेतस्थळावर जाऊन देखील नोंदणी करू शकता

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक