BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पावसासाठी मुलींचे देवाला साकडे, ग्रामीण भागात अजूनही परंपरा कायम
Posted on: 22-06-2017

ऑनलाईन मिडिया, बुलढाणा(संजय महाजन)

                     आजच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना Rain Rain Go Away..! हे गाणे शिकविले जातात..! पण आपल्या लहानपणी शाळेत येरे येरे पावसा...तुला देतो पैसा...हे गाने शिकविले जात असे. पण , आजही आधुनिक युगात एक गाव अस आहे ,जिथ पावसाला बरसन्यासाठी गावातील मुली रोज एकत्र येवून देवाला साकड़ घालतात....! जमलेल्या मुली नटून-थटून राधा कृष्णच रूप घेवून... गावातील सर्व मंदिरात गाणे म्हणत जावून.... सर्व देवांना वरुण राजाला बरसन्याची विनंती करतात.....! हे आगळ वेगळ दृश्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर गावाच....!  Rain Rain Go Away म्हणणाऱ्या युगातही देवाला विनवणी करणारी प्रथा टिकविणाऱ्या या मुली म्हणजे खरच कौतुकास पात्र आहेत.....! पाहुया काय आहे ही प्रथा......!

                   शहरातील किंवा नौकरदारांच्या मुलांना पावसाच महत्व न वाटाव तेव्हड़ महत्व शेतकऱ्यांच्या मुलांना वाटतं...! म्हणूनच की काय ...? बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर गावच्या या चिमुकल्या नटून- थटून वरुण राजाला प्रसन्न करुण घेण्यासाठी देवाला साकड़ घालण्यासाठी निघाल्यात......! 

 

भगवंता भगवंता....कशी लागली चिंता...

पाऊस येऊ दे......!

 

काही अशी विनवनी करत...., या मुली गावातील सर्व मंदिरात जाउन देवाला पाऊस पडण्याची विनंती करत... मंदिरात जाउन तेथील देवाना आपल्या जवळील कलशातील पाण्याने अभिषेक घालतात...  !  सर्व मूली या 05 ते 10 या वयोगटातील आहेत आणि शेतीला पावसाची किती आवश्यकता आहे , पेरनीचे दिवस आले असूनही अजूनही या भागात पाऊस नसल्याने या मूली देवाला वरुण राजाला बरसू दे..! अशी विनवणी करत ,गाणे म्हणत गावातून फ़िरत आहेत. यांच्या गाण्याच्या आवाजाने घरातील अबाल वृद्ध देखील याना प्रोत्साहन देण्यास , त्याचं कौतुक करण्यास...मग बाहेर येतात.....! ही अनोखी परंपरा या गावात शेकडो वर्षापासून सुरु असल्याच अनेक वृद्ध सांगतात..!

                एक काळी "मेघ मल्हार" गायिल्याने पाऊस बरसत असे...... आपल्या लहानपणी येरे...! येरे....! पावसा , तुला देतो पैसा...! हे गाणे गाइल्याने पाऊस येत असे.....! पण Rain Rain Go Away म्हणणाऱ्या आजच्या पिढीला मात्र पावसाच् महत्व काय हे सुद्धा आपण समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे....? पावसाने दांडी मारल्यावर या मूली जेव्हड्या अगतिकतेन देवाला पाऊस पडण्याची विनंती करत आहेत.....ही परम्परा मात्र Rain Rain Go Away च्या युगात ही या गावात टिकून आहे....!

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक