BREAKING NEWS
HEADLINE NEWS
भगूर कब्रस्थानात रमजान ईदच्या निमित्ताने वृक्षारोपण
Posted on: 27-06-2017

ऑनलाईन मिडिया, नाशिक

महाराष्ट्र शासन, वनविभाग हरित सेना, मार्क मार्शल आर्ट्स-पर्यावरण संवर्धन व संरक्षण परिषद नाशिक यांच्या समन्वयातून भगूर कब्रस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यातून रमजान ईदच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षणासाठी व त्याविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी भगूर कब्रस्थान येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आलेली सर्व झाडे ५ फुटाहून अधिक उंचीची असून यात जांभूळ, नारळ, बदाम, महेंदी,रातराणी, कडूनिंब यासारख्या झाडाचा समावेश आहे.

मार्क मार्शल आर्ट नेहमीच विविध सामाजिक कार्यक्रमात पुढे असते यंदाच्या वर्षी रमजान ईदच्या पवित्र सणाच्या दिवशी कब्रस्थानात वृक्षारोपण करण्याचा अनोखा कार्यक्रम करण्यात आला असल्याची माहिती मार्क मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद आरिफ खान यांनी दिली. ते म्हणाले की, ईदच्या दिवशी सर्व मुस्लीम बांधव हे सामाजिक सलोखा राखत ईद साजरी करत असतात. तसेच कब्रस्थानात जाऊन आपल्या पुर्वजांसाठी प्रार्थना करत असतात. त्यामुळे यंदा भगूर येथील कब्रस्थानात  विविध जातीची फळझाडे व इतर उपयोगी झाडे लावण्याचा संकल्प केला होता.  त्यानुसार वृक्षारोपण करून येथील फळझाडापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून कब्रस्थान देखभालीसाठी लागणारा खर्च यातून मिळणार आहे. तसेच या झाडांमुळे पशु पक्षांना अन्न, पाणी व निवाऱ्याची सोय होणार असल्याचे  सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगूर येथील जुम्मा मस्जीदचे मौलाना हाफिज इक्बाल, मिनारा मस्जीदचे मौलाना मोहम्मद अफाक राजा फकीरा व शाही मस्जीदचे मौलाना हनीफ शेख उपस्थित होते. यावेळी बिस्मिल्ला खान, भगूर कब्रस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुनीर अमिर मनियार, फरीद शेख, युनुस मुल्ला, सानिया आरिफ खान, मन्सुर मनियार, खुर्शिद अन्सारी, सलीम खान,जमील शेख, हाजी रशीद खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मोहम्मद आरिफ खान यांनी केले. 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक