BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पुणे जिल्हा पत्रकार संघ राज्यात अव्वल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
Posted on: 27-06-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषदेने पुणे जिल्हा पत्रकार संघाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला. रविवारी (दि.२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रेशीमबाग, नागपूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांसाठी लढणारी राज्यातील सर्वात मोठी व मातृसंस्था मानली जाते. या संघटनेतर्फे प्रत्येक दोन वर्षांनी राज्यात उत्तम काम करणारे पत्रकार, तालुका व जिल्हा संघांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या संघटनेचा (दि.२५) रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, रेशीमबाग हॉल, नागपूर येथे पार पडला. यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यातील एक हजाराहून पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे, कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल, उपाध्यक्ष विनायक कांबळे, सरचिटणीस प्रभाकर क्षीरसागर, कोषाध्यक्षा वनिता कोरे, विभागीय चिटणीस सुनील वाळुंज, शरद लोणकर, धर्मेंद्र कोरे, प्रशांत मैड, समन्वयक सूर्यकांत किंद्रे आणि जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती सदस्य सुभाष भारद्वाज यांच्यासह एतर पत्रकार उपस्थित होते.

पुणे जिल्हा पत्रकार संघाने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांना पेन्शन सुरू करावी यासाठी घंटानाद आंदोलन, आमदारांची सही मोहीम, काळ्या फिती लावून निषेध फेरी, यासह पत्रकारांच्या भल्यासाठी करण्यात आलेल्या अनेक आंदोलनात पुणे जिल्हा अग्रेसर राहिला आहे.

ऑनलाईन निवडणूक घेण्याचा मान

निवडणूका म्हटल्या की, अफाट खर्च. तो कमी व्हावा व निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने ऑनलाईन इलेक्शन प्रक्रिया सुरू केली. राज्यात प्रथम पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पत्रकार संघाची निवडणूक या संघाने राज्यात पहिला मान मिळवला. संघाच्या या उपक्रमाबरोबर मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या अनेक आंदोलनांमध्ये हिरीरीने पुढाकार घेतला. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचा मानाचा समजला जाणारा स्व. रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघास जाहीर करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा संघाच्या ऑनलाईन निवडणूक प्रक्रियेबद्दल पुणे जिल्हा संघाचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख करून त्यांना सन्मानित केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, सरचिटणीस यशवंत पवार, कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, पुणे विभागीय सचिव शरद पाबळे, परिषदेचे प्रतिनिधी श्रीराम कुमठेकर,शरद पुजारी, बाळासाहेब ढसाळ, उपाध्यक्ष संजय बोरा, सदस्य मदन जोशी, सीताराम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट तालुका पत्रकार संघ म्हणून हवेली तालुका पत्रकार संघाची निवड झाली. नागपूर येथे हवेली पत्रकार संघाचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष सुनील जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक