BREAKING NEWS
HEADLINE NEWS
ढिंच्याक पुजाचे वाजले बारा...झाली पोलिस केस
Posted on: 29-06-2017

ऑनलाईन मिडिया, दिल्ली

सध्या सोशल मिडिया हे एक अस साधन झालं आहे की कोणी ही यावे आणि प्रचलित होऊन जावे.. असच म्हणावं लागेल...मग यामध्ये काही लोक चांगल्या गोष्टी घेऊन प्रचलित होतात तर काही उगाच म्हणुन व्हिडीओ सोशल साईटवर टाकुन प्रचलित होण्याचा प्रयत्न करत असतात.

आणि याच पार्श्वभुमीवर सध्याची सोशल मीडियावरील अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे ढिंच्याक पूजा. तिची गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिची कोणीतरी पोलिसात तक्रार केलीय.

सध्या पूजा तिच्या 'दिलो का शुटर है मेरा स्कुटर' या नवीन गाण्यावरून प्रचंड ट्रोल केली जातेय.या गाण्यात ती व्हेस्पा स्कुटर चालवताना दिसतेय.पण गंमत अशी की या गाण्यात स्कुटर चालवताना तिनं हेल्मेट घातलंच नाही.त्यात दिल्लीच्या रस्त्यावर ती मोठ्यामोठ्यानं गाणी म्हणत दंगा ही करतेय.

हीच बाब ध्यानात घेऊन मोहित सिंह नावाच्या गृहस्थांनी दिल्ली पोलिसांकडे ट्विटरवर ट्विट करून तक्रार केली .हेल्मेट न घालता ही सुरज विहार भागात फार दंगा करत गाणी म्हणतेय असं त्यांचं म्हणणं आहे .आणि पोलिसांनीसुद्धा त्यांच्या या ट्विटला लगेच उत्तर दिलंय.यासंदर्भात कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी ट्विट करून सांगितलंय.

आता दिल्ली पोलीस पूजावर काय कारवाई करतील आणि त्यावरून पूजा किती ट्रोल होईल हे येणारा काळच सांगेल.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक