BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आरोग्यमयी नाशिकसाठी आता क्लारा रेजूवनेशन
Posted on: 03-07-2017

ऑनलाईन मिडिया, नाशिक

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य.वाढत्या तणावामुळे तसेच स्पर्धात्मक जीवनशैली मुळे आरोग्याच्या ज्या तक्ररारी निर्माण झाल्या आहेत, त्यात डीप्रेशन,अनेमिया,कुपोषण,हया महत्वाच्या आरोग्य समस्येवर नाशिक शहरात क्लारा रेजूवनेशन च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाय योजना करण्यात येणार आहेत.

       क्लारा रेजूवनेशनच्या माध्यमातुन शालेय, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक आरोग्य शिबिर आयोजित केली जाणार आहे.या शिबिरामध्ये विविध आरोग्य समस्यांच्या तपासण्या तज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून होणार आहेत.सर्व आरोग्य शिबिरांच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स इलेक्ट्रॉनिक्स हेल्थ रिपोर्ट्स या संकल्पनेत वेब ऐप्लिकेशनच्या माध्यमातुन जतन करून ठेवण्यात येणार आहेत.   

        दुसऱ्याची वेदना स्वत:ची समजून ती दूर करण्यासाठी एकत्रितपणे केलेले प्रयत्न आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सहानुभूतीपूर्वक पोचवणे हेच क्लारा रेजूवनेशनचे मुख्य ध्येय होय.क्लारा रेजूवनेशनचे कार्य उपचार, प्रतिबंध व जनजागृती या, आरोग्यक्षेत्रातील तीन स्तंभांवर आधारित आहे. हॉस्पिटल किंवा डॉक्टर्सवर होणारा अनावश्यक ख़र्च टाळून आरोग्याकड़े नियमित लक्ष ठेवण्यासाठी क्लारा रेजूवनेशन महत्वपूर्ण ठरेल असे क्लारा रेजूवनेशनच्या डॉ.स्नेहा बच्छाव यांनी सांगितले. या उपक्रमात डॉ.स्नेहा बच्छाव,डॉ.संकेत चव्हाण आणि धीरज बच्छाव आदी सहभागी आहेत

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक