BREAKING NEWS
HEADLINE NEWS
अंबरनाथमध्ये गोळीबार १९ वर्षीय आकाश घोडके जखमी
Posted on: 26-07-2017

ऑनलाईन मिडिया,अंबरनाथ

अंबरनाथ येथे लुटमारी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी चक्क गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. लुटमारीच्या उद्देशाना तरुणावर गोळीबार करुन चोर फरार झाले आहेत.

 

लूटमारीच्या उद्देशाने तरुणावर गोळीबार झाल्याची घटना काल रात्री अंबरनाथच्या लोकनगरी भागात घडली. यात आकाश घोडके (१९) हा तरुण जखमी झाला. आकाश त्याच्या मैत्रिणीसोबत रात्री ८ च्या सुमारास लोकनगरी मैदानात गप्पा मारत उभा होता. यावेळी अचानक काही जणांनी येऊन हवेत गोळीबार केला आणि त्यांच्याकडे पैश्याच्या पाकिटाची मागणी केली. पाकिट घेतल्यानंतर त्याच्या हातावर गोळीबार करून ते पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक