BREAKING NEWS
HEADLINE NEWS
जागतिक मुख व गळा कॅन्सर मोफत तपासणी शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Posted on: 28-07-2017

ऑनलाईन मिडिया, जळगाव, गजानन पाटील

जळगाव येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे आज २७ जुलै २०१७ रोजी जागतिक मुख व गळा कॅन्सर दिनानिमित्त मोफत तपासणी व शस्त्रक्रिया  शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले होते . या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . 80 रुग्नांची तपासणी सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी सायकाळी 5 वाजे पर्यंत तपासणी केली .

दरम्यान  तपासणीअंती ज्या रुग्णावर  शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा 10 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी 10 रुग्णाची गाठीच्या नमुना तपासणी डाँ. श्रीधर पाटील यांनी मोफत केली व सामान्य रुग्णालय जळगाव,जी.एम. फाउंडेशन,रोटरी क्लब आँफ जळगाव ईस्ट ,मुक्ती फाउंडेशन आदींचे पुढील शस्त्रक्रिया व मोफत औषधोपचारासाठी सहकार्य करत आहे . 

कॅन्सर रुग्णाच्याहस्ते फीत कापून उदघाटन

जागतिक मुख व गळा कॅन्सर दिनानिमित्त २७ जुलै २०१७ रोजी सकाळी ११वाजता कॅन्सर रुग्ण नानकराम रामचंदानी यांच्याहस्ते फीत कापून शिबिराचे उदघाटन करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त व नरेंद्र मोदी संघाचे अध्यक्ष नरेश खंडेलवाल ,डॉ. निलेश चांडक,जिल्हा परिषद आरोग्य सभापती दिलीप पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय चव्हाण,जी एम फाउंडेशनचे अरविंद देशमुख ,रोटरी क्लबचे अध्यक्ष गोविंद मंत्री,अँड. जमील देशपांडे,मनीष पाथ्रीकर,किरण पातोंडेकर,सीए सिद्धार्थ जैन,डॉ. नीरज अग्रवाल,डॉ. पाटोळे,डॉ. राहुल भन्साळी ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र कदम ,जिल्हाध्यक्ष भगवान सोनार ,महानगराध्यक्ष ललित खरे ,जिल्हा उपाध्यक्ष योगेश विसपुते ,ललित बडगुजर आदी उपस्थित होते . 

माणसाला सढळहस्ते मदत करावी -नरेश खंडेलवाल

कँसरसारख्या असाध्य रोगासाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून मी अनेकवेळा रुग्णसेवा करीत आलो आहे . जातीपातीचा भेद न करता शक्य तितकी मदत केली आहे . निर्जीव पैसा खिशात बाळगण्यापेक्षा सजीव माणसाला मदत करावी ,कुणालाही रिकाम्या हाती परत पाठवू नये असे आवाहन प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडेलवाल यांनी केले . यावेळी रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी केले . 

कँसर रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार -डॉ. निलेश चांडक

कॅन्सर रुग्णाला उपचार व शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च येतो . मात्र ज्या रुग्नांचे ऑपरेशन पैशांअभावी होऊ  नाही अशा रुग्नांवर अत्याधुनिक सर्वोत्तम सुविधा कशी मिळेल याकडे लक्ष देऊन येत्या आठ -दहा दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या रुग्नाच्या टॅप्सनी करण्यात येऊन शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ् डॉ. निलेश चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले . शबिराचे आयोजन चांगले झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले . 

कँसर रुग्णांना जीएम फाउंडेशनची  सर्वोतोपरी मदत - अरविंद देशमुख

जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांना जीएम फाउंडेशनच्यावतीने सर्व प्रकारची मदत दिली जाईल असे आश्वासन अरविंद देशमुख यांनी यावेळी दिले . रुग्णांच्या औषधोपचार व पुढील उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च जीएम फाउंडेशन करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले . 

 

निदान केल्याने कर्करोग बरा होतो -भगवान सोनार

आपल्याला कँसर झाल्याची माहिती जेव्हा रुग्णाला होते तेव्हा रुग्ण आता मेलो अशी खात्री होते . मात्र मुख व गळ्याच्या कर्करोगाचे वेळेत निदान केल्याने बरा होतो . त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रास्ताविकात बोलताना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी शिबिराच्या आयोजन प्रसंगी केले . यावेळी त्यांनी शिबीर आयोजनाच्या मागची भूमिका स्पष्ट केली . यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे ,डॉ. किरण पाटील,डॉ. निलेश चांडक,जीएम फाउंडेशनचे अरविंद देशमुख,जिल्हा आरोग्य सभापती,जिल्हा आरोग्य अधिकारी ,रोटरी क्लब ईस्ट ,मुक्ती फाउंडेशन आदींचे सहकार्य मिळाल्याचे सांगत आभार व्यक्त केले

 

शिबिरात या झाल्या चाचण्या

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी  मुख व गळा यांच्या कँन्सर संबंधित तपासणी केली .  यामध्ये जिभेचा कॅन्सर ,गालाचा कॅन्सर ,जबड्याचा कॅन्सर ,स्वरयंत्रेचा कॅन्सर,थॉयरॉईडचा कॅन्सर,लाळ ग्रंथीचा कॅन्सर आदींच्या कॅंसर रोगांवर उपचार करण्यात येणार आहे.

 

यांनी घेतले परिश्रम

शिबीर यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र कदम ,जिल्हा उपाध्यक्ष योगेश विसपुते ,महानगराध्यक्ष ललित खरे ,प्रसिद्धी प्रमुख आनंद गोरे , ललित बडगुजर ,कल्पेश सोनार ,संतोष महाजन ,जिल्हा सामान्य रुग्णालय , जिल्हा परिषद आरोग्य विभाग ,रोटरी क्लब ईस्ट,जीएम फाउंडेशन ,मुक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींचे सहकार्य लाभले . 

 

वर्ल्ड हेड आणि नेक कॅन्सर डे

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेड एंड नेक ऑन्कोलॉजी सोसायटीज हेड आणि मानेच्या कर्करोगाबद्दल सर्व जाणून घेण्याचे महत्त्व दर्शविण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. 55 देशांमध्ये 51 मुख व गळा कॅंसर रुग्नांची संख्या वाढत असून याला आला घालण्यासाठी फेडरेशन जनजागृती तथा यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे . त्या अनुषंगाने २७ जुलै  हा जागतिक मुख व गळा कॅन्सर दिन म्हणून साजरा करण्यात येतो . 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक