BREAKING NEWS
HEADLINE NEWS
दारूड्या जावयाची सासरच्यांनी केली हत्या, 4 आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल
Posted on: 28-07-2017

ऑनलाईन मिडिया,  चंद्रपूर(पवन झबाडे)

चंद्रपूर शहर रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील दाताळा  गावात नागपंचमीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास प्रकाश डवळे वय 47 वर्षे या व्यसनाधिन दारूड्याचा  घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत घटनास्थळीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी ताबडतोब 4 मृतकाच्या नातेवाईकांना अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना अजूनही काही आरोपी असल्याचा संशय असल्याने कसून चौकशी सुरू आहे. प्रकाशचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला.

रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील इराणी गुंडानी केलेल्या हत्येची शाई सुकत नाही तोच दाताळा गावात नायगांव येथील राहणा-या प्रकाश डवळेची हत्या झाल्याने पोलिस प्रशासन सुन्न झाले आहे. प्रकाशची दाताळा सासुरवाडी असून मागील 6 वर्षापासून तो दाताळा गावात आपल्या सास-याच्या घरीच राहात आहे. प्रकाश लग्न झाल्यापासूनच संपुर्ण दारूच्या आहारी गेला होता. व्यसनाधिनतेमुळे नायगाव येथील शेती, घर व इतर संपत्ती विकून कफल्लक झालेल्या प्रकाशचा संपुर्ण गावाला उपद्रव होता. दारू पिल्यावर आपल्या पत्नीला मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून प्रकाशला सासरच्यांनी दाताळा येथे राहण्यासाठी घेऊन आले. परंतू प्रकाशचा दारू नंतरचा उद्रेक काही केल्या कमी होईना. सासरच्या मंडळींना देखील प्रपाश दारू पिऊन मारहाण करीत असल्याने सर्व नातेवाईक त्रासून गेले होते.

 नानपंचमीचा सण दाताळा गाव साजरा करीत होते, तर प्रकाश सकाळपासूनच दारू पिऊन गावात व घरात धिंगाणा घालत होता सायंकाळच्या वेळेस प्रकाश घरी येऊन पत्नीला मारहाण करू लागला व सासुला देखील दगड फेकून मारला, वयोवृध्द सास-याच्या अंगावर देखील हात उचलला हे सर्व पाहून नातेवाईक चिडून गेले व काठ्या व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत प्रकाशचा घटनास्थळावर मृत्यू झाला.  पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक