BREAKING NEWS
HEADLINE NEWS
शेतकरी कर्ज माफी फॉर्मची पाडळसरे येथील शेतकऱ्यांकडून भरचौकात होळी
Posted on: 31-07-2017

ऑनलाईन मिडिया, अमळनेर,(गजानन पाटील)

शेतकरी कर्जा माफीच्या ऑनलाईन फॉर्मची भरणा करताना होणाऱ्या अडचणीमुळे संतप्त शेतकऱ्यांची भर चौकात फॉर्मला जाळुन चक्क होळी करण्यात आली आहे.

शेतकरी कर्ज माफिचा ऑनलाईन फॉर्मातील किचकट त्रुटी व अशिक्षित व अल्प शिक्षित शेतकरीवर्गास याचे ज्ञान नसुन कर्ज माफीच्या नावाखाली  शेतकऱ्यांशी  फसवी कर्ज माफीचा धिक्कार करत कधी साईट हॅंग तर कधी सर्वर डाऊन आदी फंदात शेतकरी काम धंदा सोडून ऑनलाईन फॉर्म भरण्याची वनवन करित ग्रामीण भागातील एकही ऑनलाईन सेंटर फॉर्म भरण्यास सरकार कडून मदतनीस म्हणून कोणीच नसून या सर्व प्रकारात सुटका म्हणून अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील शेतकऱ्यांकडून कर्ज माफि साठी भरून द्यावयाचा फॉर्मचीच चक्क मुख्य रस्तावरील भर चौकात होळी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस सरकार  हाय हाय  अश्या घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पाडळसरे पुनर्वसन समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील  समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, विका सह सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथ पाटील, वसंतराव पाटील,  ग्रा.प.सदस्य भुषण पाटील, प्रभाकर पाटील, विकासह सोसायटीचे संचालक मंगल ताथ्या पाटील, गोकुळ पाटील, योगराज पाटील,  रनछोड पाटील, प्रविण पाटील,  सुकदेव कोळी, राधेश्याम पाटील, विकास पावरा,  एकनाथ पाटील,  विश्वास कोळी, पंडित सोनवणे आदी शेतकरीवर्ग स्वयंपुर्तीने उपस्थित राहुन  कर्ज माफिचा ऑनलाईन फार्म ची होळी करून फडणवीस सरकारचा निषेध नोंदवून धिक्कार व्यक्त केला.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक