BREAKING NEWS
HEADLINE NEWS
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका
Posted on: 31-07-2017

ऑनलाईन मिडिया, मीरा भाईंदर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे निरीक्षक सरचिटणीस व मीरा भाईंदर महापालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.२८/७/२०१७ रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

डॉ. आसिफ शेख हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सर्वसामान्यांचा विकास हा दृष्टीकोन ठेवून भाजपच्या माध्यमातून जनहिताची कामे केली जातात. 'सबका साथ, सबका विकास,' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य नजरेसमोर ठेवून देशात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास होत आहे. भाजपच्या या विचारसरणीला अनुकूल असेच डाॅ.आसिफ शेख यांचे काम आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाच्या प्रयत्नात डाॅ.आसिफ शेख यांची साथ लाभल्यास, त्यांच्या अनुभवाचा फायदा झाल्यास अधिक व्यापक काम करता येईल, या हेतुने आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया मा. आ. नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अल्पसंख्याक समाजाची मोलाची साथही आम्हाला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रवेश सोहळ्याला मा.खासदार श्री.कपीलजी पाटील, आमदार श्री नरेंद्रजी मेहता,जिल्हाध्यक्ष श्री हेमंत पाटील,महापाैर साै.गीता जैन,श्री हसमुख गेहलाेत आदी मान्यवर उपस्थित हाेते.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक