BREAKING NEWS
HEADLINE NEWS
अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पतीचा निर्घृण खून
Posted on: 01-08-2017

ऑनलाईन मिडिया, शिराळा

पावलेवाडी (ता.शिराळा) येथील खिंडीत सापडलेल्या बेवारस व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

निवृत्ती गोविंद शिंदे (वय ४५, रा. घोगाव, ता.पलूस) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा खून पत्नी, प्रियकर व एक साथीदार या तिघांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अवघ्या बारा तासात खूनाचा उलगडा व तिन्ही आरोपींना अटक करण्याची कामगिरी शिराळा पोलिसांनी केली आहे.

पत्नी अंजना निवृत्ती शिंदे (वय ४०), प्रियकर विकास सर्जेराव माळी (वय ४०), साथीदार राजेंद्र हिंदुराव कांबळे (वय ५०, सर्व रा.घोगाव, ता.पलूस) अशी आरोपींची नावे आहेत.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक