BREAKING NEWS
HEADLINE NEWS
बँकेच्या तगाद्यामुळे २७ वर्षीय तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या
Posted on: 02-08-2017

ऑनलाईन मिडिया, जालना(विठ्ठल खरात)

बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घाटना अंबड तालुक्यात घडली आहे

इंदलगाव येथील किशोर नवनाथ लांडे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बॅँकेचे सव्वा लाख रुपय कर्ज होते. कर्जवसुलीसाठी त्याला बँकेकडून नोटीसही बजावण्यात आली होती.असे नातेवाईक सांगत आहे.

अवघे २७ वर्ष वय असलेल्या किशोरचे दिड वर्षापूर्वीच विवाह झाला होता.त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गोदी शाखेकडून कर्ज घेतले होते. या वर्षी परिसरात चागला पाऊस झाला नसल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.त्यामुळे कर्ज वसुलीसाठी बॅँकेने तगादा लावला होता.शिवाय नोटीस ही पाठवली होती.अशी माहिती नातेवाईकांनी दिली.याच चिंतेतून किशोरने गळफास लावून घेतल्याचे नातेवाईकने सांगितले आहे.किशोरच्या पाश्चात पत्नी,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक