BREAKING NEWS
HEADLINE NEWS
छेड़छाड़ीला कंटाळून ९ वी त शिकणार्या मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या
Posted on: 03-08-2017

ऑनलाईन मिडिया, सोलापूर(प्रमोद बनसोडे)

जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथे इयत्ता ९ वी  मध्ये शिकणार्या विद्यार्थीनीने गावातील मुलाकडून होणार्या छेड़छाड़ीच्या ञासाला कंटाळून राहत्या घरी स्वत:च्या अंगावर राॅकेल ओतून घेऊन पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली.

आलिशा  चाॅद शेख असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असुन गावातील महेश जाधव नावाचा मुलगा तिला ञास देत होता. मयत आलीशा ही अनगरमधील शंकरराव बाजीराव पाटील या शाळेत शिकत होती. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक