BREAKING NEWS
HEADLINE NEWS
चिचोंडी पाटील येथे शेतकऱ्याची आत्महत्या
Posted on: 03-08-2017

ऑनलाईन मिडिया, अहमदनगर

अहमदनगर  येथील  तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शेतकरी अमृत पाराजी हजारे (वय ४३) वर्षे यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांच्यामागे आई, पत्नी, २ मुली, एक मुलगा,असा परिवार आहे. याबाबत पोलीस पाटील संतोष खराडे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली. अमृत हजारे यांनी सकाळी ६ च्या सुमारास घराज़वळ असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत हजारे यांच्याकडे विविध सहकारी सोसायटी व सेंट्रल बँकेचे कर्ज थकित आहे, अशी माहिती मयत हजारे यांचे बंधू अशोक पाराजी हजारे यांनी दिली. अमृत हजारे हे कर्ज थकित असल्यामुळे तणावात होते, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हजारे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक