BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पत्नीस बेदम मारहाण केल्याप्रकरणी पतीविरूध्द गुन्हा दाखल
Posted on: 11-08-2017

ऑनलाईन मिडिया, मंगळवेढा(प्रमोद बनसोडे)

पत्नी व मुलीस बेदम मारहाण करून तुला घरात राहू देणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी पती बालेखान मकाजी शेख (रा.कचरेवाडी) याच्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी रेश्मा बालेखान शेख (वय 32) ही आरोपीची पत्नी असून दि.8 रोजी रात्री 9 वा.आरोपी बालेखान शेख याने पत्नीस माझे घरात राहू नकोस असे म्हणून बेदम मारहाण केली. तसेच मुलगी अनिशा हिस मारहाण करून शिवीगाळ करीत तुला घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून अधिक तपास शहान्नुद्दीन फकीर हे करीत आहेत.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक