BREAKING NEWS
HEADLINE NEWS
जारगाव चौफुली जवळ अपघातात दोघांचा मृत्यू
Posted on: 18-08-2017


ऑनलाईन मिडिया, पाचोरा(कमलेश बाविस्कर)

शहराबाहेरुन जाणाऱ्या मुंबई नागपुर हायवे वरील जारगाव चौफुलीवर भरधाव ट्रकने पाचोरा व दुर्गा नगर येथील दोन तरुणांन जबर धड़क दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.


    अपघात ट्रक चालकांने RTOचि गाड़ी पाहुन चालकाने वगाने चालविल्यामुळे हा अपघात झाला असे घटनास्थळी उपस्थित असलेले व्यक्तिची परीसरात चर्चा पसरली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाने विचारले असता त्याने पोलिसांना असा काही प्रकार झाला नसुन ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडण्याची माहिती दिली.


       हा ट्रक नजीकच्या हॉटेलात शिरल्याने वडा पाव विक्रेता वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे. हि घटना गुरुवारी 5:30च्या सुमारास घडली. पाचोराकडे तुरीचा डाळ घेऊन एक ट्रक (एमएच 04 बिके 2047) येत होता.या ट्रकने दोन दुचाकिंना (एम एच 19 बिके 5788 व एम एच 19 बीएन 367) यांना धडक दिली यात संदीप निंबाळे (वय 25 )रा.पाचोरा व विनोद मेटकर (वय 27) रा.बील्दि यांचा जागीच मृत्यु झाला.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक