BREAKING NEWS
HEADLINE NEWS
ऊस दर आंदोलनात मनसेने घेतली उडी
Posted on: 21-11-2017

ऑनलाईन मिडिया, सोलापुर

सोलापुर जिल्ह्यात १० ते १५ दिवसांपासुन ऊस दर आंदोलन पेटले असताना या आंदोलनाला कोणी मनावर घेताना दिसले नाही..तसेच गेली १५ दिवस भीमेच्या किनारी या आंदोलनाने जोर धरला आहे. यासाठी शेतकरी संघटना सोडुन आता लोकांसाठीचा पक्ष म्हणुन लोकांच्या पाठी उभा असणाऱ्या मनसेने आता या आंदोलनात उडी घेतली आहे.

दोन दिवसात उस दर जाहीर न केल्यास मनसे स्टाईल खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे  यांनी दिला आहे. सोमवारी पेनुर येथे उस दरासाठी मनसेने रास्ता रोको केला त्यावेळी ते बोलत होते

मुंबई,पुण्याचा पक्ष म्हणुन मनसेचे ओळख आहे. मात्र ग्रामिण भागात देखिल असंख्य तरुण मनसे मध्ये दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या पोरांनी आता ऊस दरात उडी घेतली आहे. गेल्या चार दिवसात सोलापुर जिल्ह्यात सर्वत्र मनसेने गांधीगिरी आंदोलन केले.

सरकार आणि साखर कारखानदारांना आता ही गांधीगिरीची भाषा समजत नसेल तर मनसे देखिल आपल्या स्टाईलनुसार आपल्या भुमिकेत येणार आहे. पोटच्या पोराप्रमाणे जपलेला उस जर कारखाने बंद ठेऊन फडातच जळावा अशी भुमिका कारकानदारांची असेल तर खळ्ळखट्याक शिवाय पर्याय नाही. दोन दिवसात दर जाहीर करा अन्याथ मनसे शांत बसणार नाही असा थेट इशारा दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. य़ा रास्ता रोको मनसे,रयत क्रांती, बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आला आहे. 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक