BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे-रामदास आठवले
Posted on: 27-12-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावात 11 विचा विद्यार्थी असणारा 17 वर्षांचा दलित युवक नितीन आगे याची भरदिवसा जातीवादातून क्रूररित्या हत्या करण्यात आली . मात्र साक्षीदार फितूर झाल्याने नितीन आगे चे मारेकरी  जरी निर्दोष सुटले असले तरी त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय नितीन आगेला न्याय मिळणार नाही . या केस मधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी राज्यशासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. तसेच  दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला  पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ असे आश्वासन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी  दिवंगत नितीन आगे च्या वडिलांना राजू आगेंना दिले.

बांद्रा येथील संविधान निवासस्थानी नितीन आगेच्या वडिलांनी राजू आगेनी  केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन दिवंगत नितीन  आगेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली . राजू आगे यांच्या कुटुंबाला  खर्डा गावात   धोका आहे . त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे . तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा अशी तसेच  आर्थिक स्थिती बिकट असल्याने समाजाने पाठबळ देण्याची आर्त हाक राजू आगे यांनी ना रामदास आठवले यांची भेट घेऊन समाजाला मारली. यावेळी रिपाइं तर्फे दिवंगत  नितीन आगेच्या कुटुंबाला  आर्थिक मदत करून अधिक 1लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी राजू आगेना दिले.

अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी च्या मुलीवर बलात्कार करूम खून करण्यात आल्याच्या अमानवी गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी रिपाइं आणि सर्व आंबेडकरी समाजाने मागणी केली होती .त्या केस मध्ये कमी पुरावे असून देखील त्यातील गुन्हेगारांना फाशीच शिक्षा झाली त्या निर्णयाचे आंबेडकरी जनतेने स्वागत केले मात्र त्याच जिह्यात खर्डा गावात  नितीन आगे च्या अमानुष हत्येतील आरोपी सबळ  पुरावे आणि साक्षीदार असताना निर्दोष सुटतात . एकाच जिल्ह्यातील या दोन्ही केस मधील  वेगवेगळे निकाल आल्यामुळे समाजात संदेश चुकीचा जात आहे.  त्यामुळे नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे.तसेच या केस मधील  फुटीर साक्षीदारांवर  कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ना रामदास आठवले म्हणाले .  नितीन आगे हा केवळ राजू आगेंचा मुलगा नाही तर आता तो संपूर्ण आंबेडकरी समाजाचा मुलगा झाला आहे. सर्व समाज आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालायाचा राज्यमंत्री म्हणून आपण दिवंगत नितीन आगे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत असे आश्वासन ना रामदास  आठवलेंनी राजू आगेना दिले आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक