BREAKING NEWS
HEADLINE NEWS
डावखरे यांच्या निधनाने उमदा नेता गमावला : मुख्यमंत्री
Posted on: 06-01-2018

             मुंबई दि. 5 : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने राजकारणापलिकडे ऋणानुबंध जपणारा एक उमदा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. डावखरे यांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील जीवनप्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषत: विधानपरिषदेचे उपसभापतीपद प्रदीर्घ काळ सांभाळताना त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखले. राजकारण-समाजकारणासह कला, क्रीडा, शिक्षण आणि संस्कृती अशा साऱ्या क्षेत्रात त्यांचा समर्थ वावर होता. विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज चालवताना त्यांच्या संसदीय कौशल्यासह हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धीची नेहमीच प्रचिती येत असे. राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांसोबतच सर्व स्तरातील मोठा लोकसंग्रह हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक