BREAKING NEWS
HEADLINE NEWS
भीमा कोरेगाव प्रकरणावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत
Posted on: 06-01-2018

          मुंबई :- भीमा कोरेगाव प्रकरणामागे काही अदृश्य हात असल्याचं माझं विधान हा काही हवेतला नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे.

           मी जे म्हणतो आहे ते किती सत्य आहे हे चौकशी आयोगाचे काम चांगल्या प्रकारे झाले तर या प्रकरणातले अदृश्य हात बाहेर येतील.

               प्रयत्न बियत्न बोलणं आता सोडा, देशातलं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण या भीमा कोरेगाव प्रकरणामुळे बिघडलेलं आहे. ही सामान्य गोष्ट नाहीये. अचानक असे काय झाले की यावर्षीच साडे तीन चार लाख लोक जमावेत. आणि सरकारला त्याची गंधवार्ता नसावी. अचानक दंगल सुरु व्हावी. हल्ले व्हावेत.
             विशिष्ट जमावाकडून विशिष्ट जातींवर हल्ले व्हावेत. हे सर्व ठरवून झालेलं होतं. महाराष्ट्रचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचे, मुंबई महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. देशात त्याचे पडसाद उमटवायचे. 2019 च्या निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन जर हे कुणी करीत असेल तर ते देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या पाठीत खंजीर खुपसला जात आहे.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा झालीय. मुख्यमंत्र्यानीही लक्ष घातलेय. त्यांना नाही जमलं तर योग्यवेळी मी तोंड उघडेन.

        धार्मिक द्वेष आणि सुडाचे राजकारण सुरु झालंय. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर जे आरोप होत आहेत तसं त्यांच्या बाबतीत आम्ही कधी ऐकलं नव्हतं ते त्यांच्यापद्धतींन काम करीत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीत ही तेच आहे.  हे दोघेही आपापल्या पद्धतीनं काम करीत आहेत. पण प्रत्येकानं समंजस भूमिका घेऊन हा महाराष्ट्र् पुढे न्यायला हवा. पण आपाआपल्या गटांच्या हाती शस्त्रे देऊन महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याचे तुकडे करण्याचं काम जर कुणी करीत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यानी राज्यकर्ता म्हणून कठोरपणे  हे मोडून काढलं पाहिजे.

        ऍट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याची उदाहरणे आहेत.  ते नाकारता येत नाही. त्यात जातीचे राजकरण निर्माण झालय. आमची तर कायम भूमिका आहे, शिवसेनाप्रमुखांनी ती अनेकदा मांडलीही मराठवाडा आंदोलनात सर्वात जास्त वापर करून विशिष्ट समाजाच्या तरुणांना तडीपाऱ्या, तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला. बाळासाहेबांनी त्याविरुद्ध आवाज उठवला होता. या देशात ट्रिपल तलाकवर चर्चा होऊ शकते  पण ऍट्रॉसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही हे दुर्दैव आहे

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक