BREAKING NEWS
HEADLINE NEWS
उल्हासनगर पटेल लो प्राईस दुकानातील नेचर फ्रेश संपूर्ण चक्की आट्यात आढळल्या आळ्या
Posted on: 11-01-2018

 

उल्हासनगर ( गौतम वाघ ): उल्हासनगर येथील कँम्प क्रं २ स्थितीत पटेल लो प्राइज दुकानातून  शिवसेना शाखा प्रमुख जगदीश माळी यांनी घेतलेल्या चक्की आट्यात आढळल्या आळ्या तेव्हा त्यांनी पत्रकार  श्याम जांबोलीकर, शिवकुमार मिश्रा , जोन डेव्हिड यांना ह्या बाबतीत माहिती दिली व सर्व पटेल लो प्राइज दुकानात गेले असता व त्या बाबतीत विचारले असता तेथील मँनेजर व इतर स्टाफने उडवाउडवीचे उत्तर दिले .

अन्नसुरक्षा अधिकारी सौ. अ.ज.विरकायदे यांनी पटेल लो प्राइज दुकानात त्यांच्या सहकारी अधिकारी सोबत येऊन तपासणी केली व पिठाचे तसेच चिक्की गुळ व पाँलिश तिळ व इतर काही वस्तूंचे नमुने तपासणी साठी जप्त केले . स्टाफचे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता तेथील मेनेजर ने प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे सांगितले .
काही दिवसांपूर्वी पण अंतिम तारीख उलटून गेलेले फळांचे ज्यूस आढळून आल्याची चर्चा सुरू आहे . तसेच अंबरनाथच्या एमआयडीसीतील पटेल रिटेलच्या गोडाऊन मध्ये रेशनिंग दुकानदार शंकर मदार यांनी त्यांच्या टेंपोत 11 लाख 12हजार रूपयांचा गहू विक़्रीसाठी आणला असता उल्हासनगर गुन्हे शाखेने धाड मारून टँम्पोसह गहू जप्त केला होता . अन्नसुरक्षा अधिकारी सौ. अ.ज.विरकायदे यांनी तक्रारदार व पत्रकारांना आश्वासन दिले की जप्त करण्यात आलेल्या नमुन्यात जर काही गैर आढळून आले तर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल .

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक