BREAKING NEWS
HEADLINE NEWS
औरंगाबादमध्ये व्हिडिओकॉन कारखाना कर्मचारी 12 दिवस सक्तीच्या सुट्टीवर.
Posted on: 11-01-2018

        औरंगाबाद (प्रतिनिधी-मोसीन शेख) - औरंगाबादमधील चितेगावच्या व्हिडिओकॉन कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांना ८ जानेवारीपासून १२ दिवसांच्या सक्तीच्या सुटीवर पाठवण्यात आलंय. सुट्या नेमक्या कशासाठी दिल्या याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भिती वातावरण निर्माण झालं आहे.

                                       व्हिडीओकॉन कंपनी ही मराठावाड्यातील सर्वांत मोठी असून यात फ्रिज, वॉशिंग मशिन,मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकराणांची निर्मिती केली जाते. औरंगाबाद मध्ये चितेगाव व भालगाव या दोन ठिकाणी व्हिडीओकॉनचे कारखाने आहेत. चितेगाव येथील व्हिडीओकॉन कंपनीकडे तब्बल ४५ हजार कोटी बँकेचे थकित असल्याचं समजतंय.तसेच या कंपनीत ६ हजार ४५९ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच नवीन वर्ष आगमनाचे कारण सांगून २८ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१८ पर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या होत्या.

७ जानेवारी रोजी प्रत्येक युनिटमध्ये नोटीस लावून ८ ते १८ जानेवारी पर्यंत पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एवढी प्रदीर्घ सुट्टी सर्वांना देण्यामागचे नेमकं कारण काय, याचा कोणताही उल्लेख नोटिसामध्ये दिलेलं नाही.विशेष म्हणजे आजू बाजूच्या गावातील तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण या कंपनी मध्ये काम करून आपली उपजीविका भागवतात पण कंपनीच्या सक्तीच्या सुट्या आणि परिसरात कंपनी बंद होणार असल्याची अफवा या मुळे कामगारांनी धडकी घेतली आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक