BREAKING NEWS
HEADLINE NEWS
जळगाव जिल्ह्यातील नामंकित पाचोरा तालुक्याला मिळाले कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी!
Posted on: 13-01-2018

गर्जा महाराष्ट्र ऑनलाईन ,मुंबई | पाचोरा:प्रतिनिधी- पोलीस निरीक्षक श्री.श्यामकांत सोमवंशी व उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांची उल्लेखनीय कामगिरी.


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस स्टेशन हे नेहमी जिल्ह्यात कायम चर्चेत राहिलेले आहे. गुन्हेगारी,अवैध धंदे, अवैध प्रवाशी वाहतूक, माल वाहतूक, खून, दरोडा,चाकू हल्ले अश्याच बऱ्याच घटना ह्या पाचोरा शहरात घडल्या आहेत. सामाजिक बांधिलकी आणि आदर्श पोलीस म्हणून जाबदारीने काम करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, ते पार पडणे कर्तव्याबरोबर एक सामाजिक जबाबदारी देखील आहे.

असेच कार्य आणि जबाबदारी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सोमवंशी साहेब व उपविभागीय अधिकारी श्री.केशव पातोंड साहेब करताना दिसून आले आहे. पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी पाचोरा पोलीस स्टेशन चा पदभार साभाळल्या पासून आपल्या कार्याचा ठसा अधिक उमटवला आहे.  अतिशय कर्तव्यदक्ष व जबाबदारीची जाणीव असणारे हे "खाकी वर्दीतील माणूस"  अति उत्कृष्ठ व्यक्तिमत्व आहे.  आपल्या जबाबदारीवर रुजू झाल्यापासून शहरामध्ये २००० पेक्षा अधिक  वाहनावर कारवाई करून अवैध वाहतुकीला व त्याच बरोबर वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण,दादागिरी, गावठी दारू भट्ट्या उध्वस्त करून शहरात वेगाने होणाऱ्या जनतेचा त्रास हा अतिशय कमी केला असून पाचोरा शहरातील अनेक प्रलंबित गुन्हेही उघडकीस आणले आहेत.

 पोलीस म्हटलेकी सर्व सामान्य नागरिकांच्या मनात एक भीती निर्माण होते, परंतु वर्दीतील माणुसकी सोमवंशी यांनी जपली आहे.  गेल्या वर्ष भरात गर्जा महाराष्ट्र न्युज समूहाच्या माध्यमातून सर्व्हे केला असता पी आय सोमवंशी यांची कामगिरी उच्च दर्जाची दिसून येते.  महिला,विद्यार्थिनी-विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले, व सर्वसामान्य माणूस आज पाचोरा  शहरामध्ये सुटकेचा श्वास घेत आहे. प्रत्येक सामान्य व्यक्तीला आपल्या जवळ बसवून त्यांच्या समस्या समजून घेणे यात फार काही अधिकारींना जमत नाही, परंतु  पी.आय.सोमवंशी आदराने सर्वसामान्य माणसाला वागणूक देतात.  कुठलीही घटना असो शांतपणे समजून घेऊन अतिशय कायदा पाळणारे कायदयाने चालणारे कागदावर जे असेल ते करणारे पी. आय.शामकांत सोमवंशी हे आहेत. अट्टल गुन्हेगारांसाठी कर्दन काळ बनलेले आहेत, पाचोरा शहरातील जवळपास सर्वच सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावणारे व पोलीस हा तुमचा सेवक आहे असे ते नेहमी सांगून पोलीस व सामान्य नागरिक यांचा समन्वय कसा वाढेल असे कार्य ते नेहमी करत असतात.  कोणत्याही राजकीय दबावाला ते बळी न-पडता घटना सत्य असेल तर ते कोणीही राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी न पडत नियमित सतत कार्य करणारे आदर्श पोलीस निरीक्षक सोमवंशी यांचा चेहरा म्हणून समोर आला आहे.

याच बरोबर सामान्य माणसांसोबत राहून कार्य करणारे पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे ऊर्जा देणारे माध्यम आहे. पी आय. सोमवंशी यांच्या कामाला नेहमीच मार्गदर्शन व पाठिंबा हा पाचोरा शहरातील उपविभागीय अधिकारी केशव पातोंड यांचा आहे.  समाजामध्ये आदर्श पोलीस कसा घडावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे उपविभागीय अधिकारी श्री. केशव पातोंड साहेब हे अगोदर चाळीसगाव येथे कार्यरत होते, उत्तम कामगिरी बजावणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

केशव पातोंड साहेब यांच्या बदल थोडक्यात माहिती अशी कि चार पावसाळे,चार हिवाळे,चार उन्हाळे नक्षलवाद्यांसोबत बंदूक आणि गोळी चा खेळ खेळून आलेल अधिकारी आहेत.* जळगाव जिल्ह्यात जवळपास पोलीस उपनिरीक्षक,पोलीस निरीक्षक, त्यांनतर उपविभागीय अधिकारी असा यांचा प्रवास आहे. नेहमी रात्री बे रात्री पातोंड साहेब हे नेहमी सतर्कतेचा भूमिकेत असतात, पाचोरा पोलीस स्टेशन,पिंपळगाव पोलीस स्टेशन व्यतरिक कार्य करून इतर अधिकारी वर्गाला मदत करणे हि भूमिका 

ठेवून कार्य करत असणारे व्यक्तीमत्व म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.  व  नेहमी चांगला माणूस नेहमी चांगलाच असावा व वाईट वळणावरील माणूस हा चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यापैकी ते एक अधिकारी आहेत.  मी स्वतः काही अनुभवलेले गोष्टी अश्या कि सर्व सामान्यसाठी खाकी वर्दीतला साधा मनमिळावु माणूस सर्वांना हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व हे केशव पातोंड साहेब आहेत.  ह्या पाचोऱ्यातील राम आणि शाम च्या जोडीच्या कार्याला गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहातर्फे सलाम.


*

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक